मालक
विद्यापीठांचे कुलगुरू, मोठमोठ्या महाविद्यालयांचे प्राध्यापक, प्राचार्य, मंत्री, खासदार एवढेच काय तर कधी-कधी मुख्यमंत्री देखील त्यांच्या बैठकीला असायचे! सगळा गाव त्यांना 'मालक' म्हणून ओळखायचा. त्या एवढ्याशा गावात एखाद्या दिवशी १७-१८ गाड्यांचा ताफा यायचा, खूप सारे पोलिस, सुटाबूटात असलेले अधिकारी असला जामानिमा यायचा. भारल्यागत गाव सारे बघत असायचा, आणि मग एखाद्या गाडीतून कधी एखादा मंत्री, खासदार, एखादा आजी-माजी मुख्यमंत्री उतरायचा. वाड्यापर्यंत पायी पायी चालत जाऊन मालकांना भेटायला जायचा!
मालक जमीनदार होते. वंशपरंपरागत चालत आलेली जमीन, त्या जमिनीसोबत कमावलेली श्रीमंती, आणि त्या श्रीमंतीसोबत मिळवलेली असामान्य प्रतिष्ठा! त्या प्रतिष्ठेबरोबर त्यांनी कमालीची माणूसकी जपली होती.
मालक स्वतः किती शिकले होते हे माहीत नाही. तसेही पदव्यांचा आणि ज्ञानाचा परस्परसंबंध असतोच असे काही नसते म्हणा! कारण पदव्या न घेताही त्यांनी ज्ञानाचे आणि ज्ञानदानाचे महत्त्व ओळखले होते. गावात त्यांनी शाळा सुरू केली. ब्रिटीश गेले ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडून गेले. ते गेल्यानंतर देश उभा करायचा होता. हे करायचे म्हणजे नुसती भाषणे ठोकून भागण्यासारखे नव्हते. जे काही लोक ही जबाबदारी ओळखून पुढे आले त्यातले मालकही एक होते. गावातल्या मुला-मुलींना २०-२२ मैल तुडवून शाळा शिकायची वेळ येऊ नाही म्हणून शाळा सुरू केली. बघता बघत शाळा वाढली तिथेच कनिष्ठ आणि नंतर महाविद्यालयही स्थापन केले. गावात औषधपाण्याची सोय नाही मग एवढामोठा सरकारी दवाखाना आणला. रस्त्या-पाण्याची सोय केली. पतपेढी सुरू केली. बँक आणली. गाव घडवला.
पावणे-सहा फूटांच्या आतबाहेर उंची, सावळा रंग, धीरगंभीर मुद्रा. पांढरे स्वच्छ धोतर त्यावर पांढरा स्वच्छ सुती सदरा, गळ्यात तुळशीची माळ, खांद्यावर उपरणे, पायात कातडी वहाणा वा बिनाबंदाचे जोडे असा त्यांचा वेष असे. नंतर वार्धक्याने हातात काठी धरायला दिली पण त्यांना ती आवडत नसे. तत्त्वे प्राणापलिकडे जपलेली आणि धोरणे स्वतःला पटतील तीच! मग तीच धोरणे अंमलातही आणायचे. जुना-जाणता काँग्रेसमन म्हणून अवघ्या पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती तशीच ती मुंबई दरबारातही होती!
मालक अतिशय करड्या शिस्तीचे होते पण तितकेच मितभाषी होते. गावातल्या कार्टयांनी धिंगाणा वगैरे केलेला अजिबात चालत नसे. असे काही झाले तर चाबकाने फोडून काढीत. लाऊडस्पिकर इतर वेळी तर सोडाच सणासुदीलाही लावू द्यायचे नाही. सिनेमाची गाणी लावून काय धिंगाणा घालता असे विचारायचे. त्यांना प्रतिप्रश्न करण्याची प्राज्ञा ती कोणाची? गावातल्या लेकी-सुनांबद्दल अपार आदर आणि गावातल्या प्रत्येकाने तेवढाच आदर स्त्रियांबद्दल मनात जपला पाहीजे असा त्यांचा कटाक्ष असे. यात कुठे कोणाची चूक होण्याचा प्रश्नच नव्हता, फोडून काढीत!
ते प्रेमही तेवढेच करायचे. कधी बोलून दाखवायचे नाही म्हणून काय झाले! एकट्या संसाराचा पिता कोणालाही होता येतं, हजार पाचशे कुटूंबाचा पालनहार होणं एखाद्यालाच जमतं. लहान मुलं त्यांना 'मोठे-बाबा' म्हणत.
पंढरीच्या विठोबालाही त्यांनी गावातच आणले होते. गावात त्यांनी विठ्ठलरुक्मिणीचे मंदीर बांधले होते. सकाळ-संध्याकाळ मंदीरात हरिपाठ चालायचा. ते स्वतःपण हरीपाठात सामील व्हायचे. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी होऊन नाचायचे! त्या मंदीरात वर्षातून एकदा यज्ञ करायचे. गावभोजन द्यायचे. गावातल्या एकेका व्यसनी माणसाला यज्ञासमोर ऊभे करून व्यसन सोडण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावायचे.
त्यांना विडिओ - सिनेमा अजिबात आवडायचा नाही. 'कशाला पाहीजे सिनेमा, पोरे बिघडतात' असे म्हणायचे. विडिओ - सिनेमाला नाही म्हणणाया मालकांना मात्र शाळेत संगणकशास्त्राची आणि विज्ञानाची प्रयोगशाळा सुरू झाल्यावर केवढा आनंद झाला होता! गावात सिनेमा नव्हता, दारूचा अड्डा नव्हता म्हणूनच की काय पोलिस चौकीही नव्हती. गावात पोलिस चौकी नसणे ही गावासाठी अभिमानाची बाब होती आणि त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची !
कधी गावात कोणाकडे पाहुणा-रावळा आल्याचे कळाले तर मोठ्या जिव्हाळ्याने वाड्यावर नाहीतर मंदीरात बोलावून घ्यायचे. आदराने विचारपुस करायचे. चहा-पाणी द्यायचे. जाताना हातावर खडीसाखर ठेवायचे. कोणाच्याही घरात मंगल-अमंगल प्रसंग आला तर धावून जायचे. तिथे जाती-पातीचा भेद नव्हता, गरीब-श्रीमंतीचा भेद नव्हता. 'माझ्या काय पाया पडता, विठोबाच्या पडा' असे म्हणायचे.
...काल-परवा मालक निवर्तल्याची बातमी कानावर पडली. आभाळाएवढा मोठा माणूस गेला. डोळ्यातल्या पाण्यासोबत जुन्या आठवणीही बाहेर आल्या.

0 Comments:
Post a Comment
<< Home