Saturday, September 08, 2007

काही(बा)ही

(ग्रेसप्रेमींनी खालील लेखन फार गंभीरपणे घेऊ नये अशी विनंती)
पावसाच्या अगणित थेंबांनी काहूर माजवून माजवून बाहेर जो चिखल तयार केला त्या चिखलावर उमटलेल्या पाऊलखूणा पाहून मला कुंभाराची कहाणी आठवते आहे. कुंभाराने तयार केलेला चिखल, हा रस्त्यावरचा चिखल, खेटरांच्या तळव्याला लागेलला चिखल आणि झाडावरची फुले. जमिनीवर माजलेल्या चिखलामध्ये आणि कुंभाराने तयार केलेल्या चिखलामध्ये मला विलक्षण साम्य जाणवते आहे. कुंभाराच्या चिखलामध्ये सर्जनक्षमता आहे, तशी ती या रस्त्यावर पडलेल्या चिखलात नाही असे म्हणण्याचे धारिष्ट्य मी करू शकत नाही, कारण हा चिखलही निर्मितीशील आहे. वृंदावनातील तुळस, रस्त्यावरचा पळस आणि दौपदीच्या घरातला चाफा हे सगळेच घटक याच चिखलातून उमटलेले मला दिसतात. पावसाची पडणारी थेंबे आणि ती जमिनीवर पडत असताना तयार होणारा अंतर्गत नाद हे ऐकत असताना माझ्या मनात अनेक भावविभावांच्या विविधाविध प्रतिमा तयार होतात. या प्रतिमा अंधारातल्या काळोखात पडवीतल्या कोळीष्टकांशी गुंजारव करतात. तुकारामाने व्यक्त केलेला अर्थांतरन्यास अश्याच अत्यंत गडद भावविभोर जाणिवेतून उत्पन्न झालाच नसेल हे कशावरून? तर चिखलाची प्रतिमा, पळसाची भावमुद्रा आणि द्रौपदीच्या घरातल्या चाफा याच्या आक्रुतिबंधाचा मेळ एकदा फार पूर्वी पाहिलेल्या परेश रावलच्या हेराफेरीत दिसला होता. चिखलाची गोष्ट आपण बाजूला ठेवू कारण गगनहाकेची रेंज, ताऱ्याची दीर्घशीळ , पावसाच्या पाण्याने जमिनीवर मांडलेली आक्रोशहाक याचे आणि (परेश रावलच्या हेराफेरीचे, ..ह्म्म चुकले!) संकल्पनेच्या अनुभवविश्वाचे तसेही अर्थाअर्थी सोयरसुतक नाहीच आहे.दुसया शब्दात सांगायचे तर This statement has no status of any other value rather than it's own saying of heart.तर चिखलाच्या प्रतिकशक्तीला अनुभवविश्वाच्या संसर्गाचा आघात करून कुंभाराने चाक फिरवून फिरवून केलेले मातीचे भांडे मला माझ्या निर्मितीविश्वाची कसोटी जरूर वाटते. पण याच निर्मितीविलक्षण साधर्म्यातून पिंजून पिंजून कोष्ट्याने तयार केलेले कापड याचा अनुभवमेळ कसा बसणार? Everytime you have to take the concept at the stake and at the stake, no experience is there? हे कसे?
ते जाऊ द्या निर्मितीविश्वात प्रत्येकच वेळेला फळ आलेच पाहीजे असे थोडेच आहे, पळसाला फुल असते फळ कुठे असते, आणि दौपदीच्या चाफ्याला तरी कुठले फळ तिथेही नुसती फुलेच!
आता पाऊस पडून पडून चिखलतळे तयार झाले आहे. या चिखलतळ्यांवर अनेकानेक कीडेकिटक झिम्मा-फुगडी खेळत आहेत, यातून चिखलतळ्यातल्या फुलसावलीचे अनुभवविश्व मांडण्याचा असा प्रयत्न केला:
कीडा वळवळे येथे,
तेथे किडा वळवळे,
चिखलाच्या तळ्याला
मातीपाण्याचेच आळे

मातीपाण्यात रूजले
पळसफुलाचे बीज
पळसाच्या नशीबात
कुठे चाफ्याचे फुल..?

(हुश्श थांबतो आता....)

4 Comments:

Blogger Sandeep Padhye said...

YACHA LEKHAK KON?

2:55 AM  
Blogger bhaskarkende said...

kaay re funde marat asato ha nehami? BTW its grippy while reading.

4:49 AM  
Blogger Rutu said...

sandeep dada, he mi swata lihile aahe ..

7:16 AM  
Blogger Rutu said...

more about this article: khoop kathin shabd use karun lihile mhaje te khup chhan aste asa aplya kade ek samaj aahe. baryaach velela lihinarach itka gondhalelaa asto ki vachanaryala aapun kaay vachat aahe hech kalat nahi. keval kahitari mast vaachat aahe asa samaj hot raahato - pun shevati tyaa lihinyaat kahi tathya nasate. barech lekhak ase kartaat. tyaache he vidamban samajaa. (satire type)

7:21 AM  

Post a Comment

<< Home