आग्ग्या आंबा

पारटकरांच्या अखिल प्रतिष्ठानांमध्ये आग्ग्या आंब्याचे स्थान एकमेवाद्वितिय आहे! मुळावा आणि आंब्याचे नाव निघाले की ती चर्चा आग्ग्या आंबा आणि त्याच्या आठवणी याच्या अवतीभवतीच फिरत राहतेच. त्यातली प्रत्येक उन्हाळ्यात सांगीतली जाणारी आग्ग्या आंब्याची सौ. सगुणा आत्याच्या लग्नातली आख्यायिका तर सर्वांना सुपरिचित आहे. त्याकाळी म्हणे मराठवाड्यातल्या लोकांना आंब्याचे आप्रुप असायचे. सगुणाआत्याच्या लग्नात मराठवाड्यातून आलेल्या त्या अवघ्या वहाडाला आग्ग्या आंब्याचा रस करून वाढला होता. पण तेव्हापासून म्हणे त्या आंब्याला दृष्ट लागली आणि तेवढे आंबे नंतर त्या झाडाला कधी आले नाही. अवघ्या पंचक्रोशीत या आग्ग्याची ख्याती होती. जणू काही मुळाव्यातला हापूस!
मधमाधींच्या मोहोळामध्ये सगळ्यात गोड मध 'आग्ग्या' जातीच्या मधमाशांचा असतो. त्या मधाइतका गोड रस म्हणून या आंब्याचे नाव आग्ग्या!
मधमाधींच्या मोहोळामध्ये सगळ्यात गोड मध 'आग्ग्या' जातीच्या मधमाशांचा असतो. त्या मधाइतका गोड रस म्हणून या आंब्याचे नाव आग्ग्या!

0 Comments:
Post a Comment
<< Home