Thursday, September 06, 2007

दिसामाजी काहीही लिहावे!

इथे सध्या गुलाबी थंडी सुरू झाली आहे. हळूहळू ती बोचरी होईल आणि मग काटेरी! ती एकदा काटेरी झाली की झाडावरून इकडे तिकडे फिरणार्या खारूताया दीर्घनिद्रेसाठी म्हणून जमिनीखाली दडून बसतील, पुढचा उन्हाळा येइइपर्यंत! आपल्या इकडच्या खारींना रामाने हातात घेऊन आशीर्वाद दिला होता म्हणे. त्यामूळॆ त्यांच्या पाठीवर राम-लक्श्मण-सीतेच्या तीन रेघा असतात. इकडच्या खारींच्या पाठीवर मात्र असल्या रेघा दिसत नाहीत. मी असाच एकदा विचार करत बसलो की असा फरक का असावा. मग कळले. इथल्या खारूतायांची शेपटी मांजर रागावल्यावर जशी फुगवते तितकी मोठी असते, आपल्या खारूताया कश्या नाजूक आणि बारीक वगैरे असतात. इथल्या खारी म्हणजे घुशीएवढ्या मोठाल्या! त्या मर्यादापुरूषोत्तमालाही असल्या भीषण खारी हातात घेऊन आशिर्वाद - बिशिर्वाद काही द्यावा वाटला नसेल! हीहीहीहीही!!
आपला, रुतूराव

0 Comments:

Post a Comment

<< Home