Monday, November 05, 2007

तिखट-मीठा पुरती संस्कृती..

का शिकायची - तर तीच आपली ओळख आहे ... सकाळी उठताना ’कराग्रे वसते..’ म्हणावे - म्हटले नाही तरी निदान महित असावे ... अर्थ माहित असावा .. जेवताना ’वदनी कवळ...’ म्हटले नाही तरी चालेल - पण निदान महित असावे ... वेळप्रसंगी चार चौघांच्य पन्गतीत म्हणता यावे ... एखादे दोन मनाचे श्लोक पाठ असावेत - असावेत कारण का नसावेत याचे उत्तर फारसे कन्व्हिन्सिंग येनार नाही म्हणून ...
शिवाजी चा फोटो घरात असावा ... शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे... शिवरायांचे सलगी करणे, कैसे असे! द्न्यानेश्वर माउलींचा फोटो घरात असावा ... मराठी माणसची ओळख आहे ही... द्न्यानेश्वरी आणि दासबोध घरात असायला काय हरकत आहे? एक दिवस बाहेरचे जेवण टाळले तर दोन्ही पुस्तके विकत मिळू शकतात ... का घ्यावे?.. कारण आपण नाही घेतले तर गुजराती किन्व तमिळ मानुस तो विकत घेणार नाही! ...

पसायदान पाठ असावे ... एखाद्या वेळी पसायदान गुणगुणताना चांगले वाटते ...विश्वधर्माची प्रार्थना करणारा द्न्यानेश्वर कीती महान विचारवंत असेल.... प्रचिति येते,

दुरितांचे तिमिर जाओ,
विश्वस्वधर्म सुर्ये पाहो॥
जो जे वांछील तो ते लाहो,
प्राणिजात॥

एवढ्या गोष्टी पाठ असतील तर रामरक्षा, अथर्वशिर्ष आणि गीतेतला किमान १२ वा आणि १५ वा अध्याय पाठ असावा ... किंवा शिकुन घ्यावा ... निदान वाचता तरी यायला हवा ...

आता याविरुद्ध किमान १०० पॊईंट्स तरी लिहिता येतिल की या सर्व गोश्ति कश्या अव्यवहार्य आहेत ते हे सिद्ध करण्यासाठी .... पण सगळ्याच गोष्टीत फायदा आणि तोटा पाहायचा नसतो ... आणि असावे म्हणजे असावे ... युक्तिवाद करुन आणि पर्यायाने न करून स्वतःच्या आयडेंटीटी बद्दल इतके निरुत्साही राहुन उपयोग नाही ...

काही लोक म्हणतात की चातुर्मास, हरिपाठ आणि पंचांग ही घरात असावे... माझे म्हणने अनुकुल आहे ... आपल्याला त्यातले काही कळले नाही तरी चालेल .. पण या सर्व पुस्तकांची किंमत १०० रुपयांच्या वर नाही.....

यातल्या बराचश्या गोष्टी बहुदा कै. बालु काकांनी सांगीतलेल्या असाव्यात असे मला वाटते ..... त्यामुळे घरात काळी टोपी आणि उपरणे असावे .... कै. बालु काकंचा फोटो नसला तरी चालेल ... पण त्या टोपी आणि उपरण्यामुळे घरात धाक तरी राहिल!

(घरातल्या देव्हार्य़ात देव असावेत, कापसाच्या वाती आणि फ़ुलवाती असाव्यात, समई असावी, निरांजनी असावी, अंगनात तुळशीचे रोप असावे... वगैरे वगैरे अजुन २५-३० वर्षानी ही पण लिस्ट ऎड करावी लागेल .. कालाय तस्मे नमः! दुसरे काय!)

आपला, ऋतु पारटकर
(सध्या वय वर्षे ७०)

0 Comments:

Post a Comment

<< Home