यजुर्वेद
यद्न्ययागाचे सर्व मंत्र यजुर्वेदात दिलेले आहेत. या वेदाला कर्मकांडांचा वेद असेही म्हणतात. वायु नावाच्या ऋषिंनी यजुर्वेदाचे मंत्र संकलित केले आहेत असे मानतात. वायु हे चैतन्याचे सुद्धा प्रतिक आहे. यजुर्वेदात यद्न्यला सर्वोत्कृष्ट कर्म मानले गेले आहे. यद्न्यवेदीवर यद्न्याचे मंत्र म्हणण्यार्या पुरोहिताला अध्वर्यु असे संबोधतात. यजुर्वेदाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे. संहिता, उपासना आणि मंत्रोच्चारणाच्या पद्धतीवरून असे वर्गीकरण केले असावे.
- शुक्ल यजुर्वेद
- माध्यंदिन
- कण्व
- कृसःन यजुर्वेद
- तैतेरीय
- मैत्रयिणी
- कथक
- कपिष्ठलकथा
महत्त्व:
यजुर्वेदात सर्व सोळा संस्कारांचे मंत्र दिले आहेत. यात मनुष्यजातीच्या कल्याणासाठी म्हणून जे प्रसिद्ध यद्न्य केले जातात त्याच्या विधी व मंत्र दिले आहेत. जसे - अश्वमेध - नरमेध - सर्वमेध(मेध याचा अर्थ त्याग अथवा बळी असा नसून तो कल्याण असा आहे.)
य्जुर्वेदातील देव: प्रजापति, रुद्र, विष्णू वगैरे ऋग्वेदातले देव येथे यजुर्वेदात एवढे महत्त्वाचे नाहीत. तर शिव, शंकर, महादेव हे देव अधिक महत्त्वाचे! शिव - ही कल्याणाची देवता आहेशंकर - ही नद्यांची देवता आहे महादेव - म्हणजे देवाधिदेव. सर्व चराचराच्या कल्याणाची देवता. तशी विष्णूचीही पूजा यजुर्वेदात केली जाते. असूर - ऋग्वेदात हे बलिष्ठ देव म्हणून ओळखल्या जातात, पण जसा त्यांचा यजुर्वेदात प्रवेश होतो, तशी ही मंडळी महाभयंकर राक्षस म्हणून गणल्या जातात. नाग ही पण यजुर्वेदातली देवता, ऋग्वेदात नागदेवतेचा उल्लेख आढळणार नाही. (?)
आता या लेखनाचा शेवट यजुर्वेदातल्या प्रार्थनेने करू या:
ॐ स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवःस्वस्ति नः पुषाः विश्ववेदा:स्वस्ति नस्तार्क्षोरिष्टनेमिस्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शांति शांति शांतिः
(यजुर्वेदी पद्धतीप्रमाणे ष चा उच्चार ख असा होतो आणि य चा ज)
अर्थ: जो सर्व चराचरांचे ऐकतो, जो सामर्थ्यशाली आहे, जो सर्वद्न्य आहे, जो अश्वाप्रमाणे चपळ आणि बृहस्पति (प्रमाणे द्न्यानी) आहे, तो सर्वांचे कल्याण करो.
इति.
॥ शुभम भवतु ॥

1 Comments:
this is a collected information . ... as i was reading a commentory on vedas by one western author, so curiously googled some information, also, i have one book on vedas ... some of the information is heard from elder paratkars (specifically about the pronounication methods ... references are not given as i havent kept any book in front of me while writing this information. if you find any errors, you are welcome to correct them .. regards, Rutu
Post a Comment
<< Home