काव्यीळ
काविळ झालेल्या माणसाला जसे सगळीकडे पिवळेच दिसते तसे कबितेतील प्रियकराला सगळीकडे त्याच्या प्रेयसीचे शब्द्च शब्द दिसू लागले. हापिसात शब्द, वरणात शब्द, भातात शब्द, बॉसच्या मख्ख चेहऱ्यावर शब्द. शब्दच शब्द. असे सगळे झाले आणि यालाही काव्यीळ झाला. यालाही वाटले आपणही तिला आपल्या भाव-भावना कवितेद्वारे कळवाव्यात - त्या अश्या:
शब्दार्थ व टीपा:काव्यीळ =एखाद्याला जसे खरोखरचे भूत दिसले किंवा पिसाळलेले कुत्रे दिसले की जसा दरदरून घाम फुटतो; तसेच एखाद्याला भळभळून कविता फुटत असेल तर समजावे की या व्यक्तीला काव्यीळ झाला आहे.
शब्द कसे सये तुझे, जसे पूनव-चांदणे
पाहुनिया मन त्यांसि, शोधी निद्रेचे बहाणे ।
शब्द आलवार तुझे, मखमली मोरपीसं
जशि बाहेर पडति, माझ्या कानातुन केसं ।
शब्द चंद्र, तारे, वारे, ग्रह, नभ, आसमंत
नको पाहू राणि माझ्या, कल्पनेचा असा अंत ।
राजहंसि कल्पना त्या, विहरिती स्वप्न-तळी
जशी रांगते रांगते, फुलावर हिर्वी अळी ।
शब्द तरल भावना, गालि आसवांची रांग,
(ओळी कवितेच्या तुझ्या, जिराफाचि लांब टांग) ।
नको नको प्रिये अग, पुरे झाला 'शब्द-खेळ'
सहेल्याला तुझ्या झाला, अता शब्दाचा काव्यीळ।*
ही कविता अष्टाक्शरी या प्रकारातली आहे, म्हणजे प्रत्येक कडव्यात आठ अक्षरे. थोडे लक्षपूर्वक पाहीले तर प्रत्येक कडव्यात parody जाणवेल. मी असे काही मध्यंतरी वाचले होते, म्हणून असे काही लिहून पाहावे असे वाटले. आवडले तर कळवा आणि नाही आवडले तरीही.
ऋतु पारटकर

0 Comments:
Post a Comment
<< Home